आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात गारवा:भडगाव शहर; परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

भडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पावसाने भडगाव तालुक्यात दुपारी १० मिनिटे मध्यम स्वरूपात हजेरी लावली. अचानक आलेल्या रिमझिम पावसाने अनेकांची धांदल उडाली.गेल्या दोन दिवसापासून भडगाव तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाचे सावट दिसून येत आहे. शहरासह तालुक्यात दिवसभर आकाश ढगाळलेले असल्याचे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, आगामी एक ते दोन दिवसात हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असतानाच १४ रोजी सायंकाळी भडगाव शहरात तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर आज (१५ राेजी) ही तालुक्यात काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस बरसला. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्यास काही पिकांसाठी ताे घातक ठरेल, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...