आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत यांना ईडीने केली अटक:राऊतांचा भोंगा किमान तीन वर्षे बंद -आमदार गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

जामनेर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यांची किमान तीन वर्षे जेलमधून सुटका होणार नाही. त्यामुळे राऊत यांचा भोंगा किमान तीन वर्षांसाठी बंद होणार असल्याचा दावा भाजपचे नेते तथा आमदार गिरीश महाजन यांनी दिव्य मराठीशी बोलतांना केला.

गैरव्यवहाराचे सर्व पुरावे असल्यामुळेच खासदार राऊत यांना इडीने अटक केली. राऊत हे किमान तीन ते चार वर्षे जेलमध्ये राहतील. राऊत यांच्या समर्थनार्थ शंभरही शिवसैनिक रस्त्यावर उतरले नाहीत. यावरूनच सर्व काही स्पष्ट होते.

यापूर्वी खासदार नवनीत राणा या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठणासाठी जाणार होत्या. तेव्हाही ठाकरे यांच्या घरासमोर बोटावर मोजण्याइतकेच शिवसैनिक होते. मात्र त्यानंतरही उध्दव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या सल्ल्याने बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेल्या शिवसेनेच्या विचारांशीच फारकत घेतली. राऊत यांच्या माध्यमातून ठाकरेंपर्यंत जावे लागत असल्याने स्वपक्षाच्या आमदारांशी दुरावा निर्माण झाला, असे महाजन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...