आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:त्रिमूर्ती संस्थेतील क्रीडा संकुलाचे भूमिपूजन अन‌ गुणवंतांचा गाैरव

धरणगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्तदान ही अतिशय आवश्यक बाब असून यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्रिमूर्ती शिक्षण समूहातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.याच कार्यक्रमात त्रिमूर्ती समूहाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असणाऱ्या भव्य क्रीडा संकुलासह विविध उपक्रमांचे भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या क्रीडा संकुलात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो व बॅडमिंटन अशा मैदानी स्पर्धा घेता येणे शक्य हाेईल. बांभोरी शिवारात असणाऱ्या त्रिमूर्ती शिक्षण समूहातील विविध उपक्रमांचे आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद‌्घाटन केले.

यासोबत नवीन एम.फार्मसी महाविद्यालयाचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व त्यांच्या स्वाक्षरी केलेल्या “सिग्नेचर बॅट’ देऊन सत्कार करण्यात आला. सुरुवातीला मंत्री पाटील यांनी गणरायांची आरती केली. दरम्यान, रक्तदान शिबिरात माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्राचे रक्तसंकलन अधिकारी वीरभूषण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले. या वेळी १०१ बॅग रक्तसंकलन झाले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पंडित पाटील, संस्थापक संचालक मनोज पाटील, संचालक विश्वनाथ पाटील, कवि प्रफुल्ल पाटील, नवलराजे पाटील, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश पाटील, प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...