आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:पाचोऱ्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेचे १ नोव्हेंबर रोजी आमदार किशाेर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.शहरातील सुमारे ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचा विषय आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पूर्णत्वास आला आहे. आमदार पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील रेल्वे स्टेशनवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील शिंदे होते.

उद्घाटक म्हणून आमदार किशोर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मुकुंद बिल्दीकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील, डॉ. भरत पाटील, रावसाहेब पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिभाऊ पाटील, माजी जि.प. सदस्य पद्मसिंह पाटील, माळी समाजाचे श्रीराम महाजन, नगरसेवक विकास पाटील, किशोर डोंगरे, बंडू चौधरी, सुनील पाटील, किशोर बारवकर, आमदारांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील, प्रवीण ब्राह्मणे, दीपक आदिवाल, खलील देशमुख, अझर खान, संतोष परदेशी, माळी समाजाचे अध्यक्ष संजय महाले, उपाध्यक्ष के. एस. महाजन, चिंधू मोकळ, शरद गीते, डॉ. गोरख महाजन आदी हजर हाेते. प्रास्ताविक के. एस. महाजन, सूत्रसंचालन प्रवीण ब्राह्मणे तर शरद गीते यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...