आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:मुंदाणे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन ; 3 लाखातून एलएडी पथ-दिव्यांचे उद्घाटन

मुंदाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र.उ. येथील विविध विकास कामांचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. सतीश पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन व उद‌्घाटन करण्यात आले. ९ लाख रुपयांच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन व जवळपास ३ लाखातून एलएडी पथ-दिव्यांचे उद्घाटन राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सतीश पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रोहन पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी सरपंच सुरेश पाटील, रमेश पाटील, डी. के. पाटील, पोलिस पाटील अशोक पाटील, रवींद्र जाधव, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास पाटील, विनायक पाटील, राजेंद्र पाटील, सुभाष जाधव, साहेबराव पाटील, बळीराम पाटील, पुंजू पाटील, भिवराज पाटील, किशोर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संदीप मिस्तरी, भूषण पाटील, सतीश पाटील, भागवत पाटील, मुकेश पाटील, संजय पाटील, बाळू पाटील, भाऊसाहेब मिस्तरी, अशोक पाटील व ग्रामस्थ हजर होते. या वेळी डॉ. पाटील विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर रवींद्र पाटील यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...