आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधान व्यक्त:सारबेटे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सारबेटे बुद्रुक आणि खुर्द या दोन्ही गावातील विविध विकास कामांचे नुकतेच आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी डॉ. किरण पाटील, प्रा. सुरेश पाटील, एल. टी. पाटील, भय्या पाटील, बाळू पाटील, महेश पाटील, पंकज पाटील, अलीम मुजावर, माजी सरपंच रज्जाक मेवाती, उपसरपंच नईम मेवाती, अरुणखा मेवाती, अमजदखान मेवाती, ज्ञानेश्वर कोळी, शकील मेवाती, मेहमूद खान मेवाती, हसन मेवाती, बशीर मेवाती, ईसुक मेवाती, अमिन मेवाती, इस्त्राईल असमयांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

यात प्रामुख्याने दोन्ही गावातून वाहणाऱ्या नाल्यावर दीड कोटी निधीतून पूल बांधला जाणार असून सारबेटे बुद्रुक गावात जल जीवन मिशन अंतर्गत ४२ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ या वेळी करण्यात आला. सारबेटे खुर्द येथे आमदार निधीतून २५ लाखात सारबेटे फाटा ते गावापर्यंत डांबरीकरण, सामाजिक न्याय विभागातर्फे ५ लाखातून रस्ता काँक्रिटीकरण व ३.३५ लाखातून काँक्रीटची गटार तयार केली जाईल. सारबेटे बुद्रुक येथे १५ लाखांचे सभामंडप बांधणे, डीसीडीसी अंतर्गत मराठी शाळेला संरक्षण भिंत बांधणे आदी कामे केली जातील. दरम्यान, आमदारांच्या निधीतून काम झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...