आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:शेंदुर्णीत पाणी योजनेचे‎ रविवारी होणार भूमिपूजन‎

शेंदुर्णी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ६८ कोटींच्या पाणीपुरवठा‎ योजनेचे भूमिपूजन, ग्रामविकास‎ मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते‎ रविवारी होणार आहे, अशी‎ माहिती पत्रकार परिषदेत देण्यात‎ आली.‎ शेंदुर्णी नगरपंचायतीने गेल्या‎ पाच वर्षांपासून महाराष्ट्र‎ शासनाकडे व केंद्राकडे वाघूर‎ धरणावरून पाणीपुरवठा योजना‎ सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.‎ पाण्याचे जुने स्त्रोत कायम ठेवून‎ वाघूर धरणावरून पाणीपुरवठा‎ होण्यासाठी मंजुरी मिळाली.‎ त्यानुसार योजनेचे काम होणार‎ आहे.

सौर उर्जेवर चालणारी‎ महाराष्ट्रातील ही महत्वकांक्षी‎ योजना अमृत दोन म्हणून केंद्र‎ सरकारच्या योजनेत मान्य झाली.‎ सदर योजना पूर्ण करण्यासाठी‎ वर्षभराची मुदत आहे. योजनेचे‎ भूमिपूजन नगरपंचायत प्रांगणात‎ कमल किसन नगर येथे रविवारी‎ दुपारी तीन वाजता होणार आहे.

‎ तसेच महावीरनगर येथे‎ जलकुंभाचे भूमी पूजन, वाडी‎ दरवाजा येथे ७० लाखाचे महिला‎ व पुरुष शौचालयाचे लोकार्पण,‎ वाडी तलावाचे दोन कोटींचे‎ सुशोभिकरण, वाडी दरवाजा‎ हाळजवळ रस्ता भूमिपूजन,‎ सोयगाव रोडवरील पाण्याच्या‎‎‎‎‎‎‎‎‎ टाकीचे लोकार्पण व तसेच नवीन‎ टाकीचे भूमिपूजन, बारी मंगल‎ कार्यालयातील शौचालय व‎ पाण्याच्या टाकीचे लोकार्पण याच‎ दिवशी होणार आहे. अध्यक्षस्थानी‎ लोकनियुक्त नगराध्यक्ष विजया‎ खलसे असतील.

कार्यक्रमाला‎ भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद‎ अग्रवाल, भाजप नेते उत्तम थोरात,‎ अमृत खलसे, चंदू बाविस्कर,‎ नारायण गुजर उपस्थित राहतील.‎ उपस्थितीचे आवाहन‎ मुख्याधिकारी साजिद पिंजारी,‎ नगराध्यक्ष विजया खलसे,‎ उपनगराध्यक्ष गणेश पाटील‎ आदींनी केले आहे.‎ बहुप्रतिक्षित पाणीपुरवठा योजनेचे‎ काम मार्गी लागल्यानंतर,‎ शेंदुर्णीतील पाणीपुरवठ्याची‎ समस्या मार्गी लागणार आहे.‎ आगामी काळातील शहराची‎ वाढणारी लोकसंख्या विचारात‎ घेऊन, नवीन पाणीपुरवठा योजनेचे‎ काम केले जात आहे. त्यामुळे‎ पुढील अनेक दशके टंचाईपासून‎ मुक्तता मिळणार आहे.‎

दररोज मिळेल पाणी
‎शेंदुर्णीत सध्या आठ दिवसांआड‎ पाणीपुरवठा होतो. नवीन‎ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित‎ झाल्यानंतर शहरात दररोज‎ पाणीपुरवठा शक्य होईल.‎

बातम्या आणखी आहेत...