आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:पिंपरखेडा येथे शिबिरात 25  दात्यांचे रक्तदान

भडगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टायगर ग्रुपचे उत्तर महाराष्ट्राचे पहिलवान सागर कांबळे, टायगर ग्रुपचे खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुपतर्फे पिंपरखेड आरोग्य केंद्रात आयाेजित शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान केले.अजय परदेशी यांनी पिंपरखेड गावातील टायगर ग्रुपच्या वतीने ७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात २५ दात्यांनी रक्तदान केले.

कर्तव्य समजून हे कार्य केल्याचे अजय परदेशी यांनी सांगितले. या वेळी उपसरपंच राजेंद्र कोळी, माजी उपसरपंच रवींद्र परदेशी, दीपक शिरसाठ, संभाजी भोसले, आबा पाटील, सागर पाटील, नरेंद्र कायस्थ, नितीन जाधव, सागर पाटील, भूपेंद्र निकम, राहुल चंदनशिव, करण चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...