आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पोलिस ग्राउंडवर १ एप्रिल रोजी आरोग्य तपासणी शिबिरात २१ जणांनी दिले रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका यमुनाबाई पाटील यांनी केले. या वेळी गोविंदराव पाटील, हिरामण पाटील, संतोष पाटील, आरएसएसचे जिल्हा कार्यवाह राजेश पाटील, राजेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, उल्हास पाटील, अभिनव पाटील हजर होते. यावेळी विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, वसंत गुजराथी, आशिष गुजराथी, प्रसन्न गुजराथी, यशवंत पाटील, अनिल पाटील यांनी भेट दिली. प्रस्तावना गजानन पाटील, सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले.
डॉ. राहुल पाटील, डॉ. सचिन कोल्हे, डॉ. नीरज पोतदार, डॉ. वैभव पाटील, डॉ. राजेश बर्डे यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिराचा २०० नागरिकांनी लाभ घेतला. अरुण गुजराथी यांनी स्वर्गीय पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आडगावचे रहिवासी व चोपडा शेतकी संघाचे माजी चेअरमन स्वर्गीय एल. एन. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम राबवला.
आज कीर्तन तर उद्या पुस्तक प्रकाशन सोहळा
३ एप्रिलला रात्री ८ वाजता गणेश कॉलनीत दीपक महाराज रेलकर यांचे कीर्तन होईल तर ४ रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय एल. एन. पाटील यांच्या आठवणीतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या वेळी अरुण गुजराथी अध्यक्ष तर प्रताप कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. एल. ए. पाटील उपस्थित राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.