आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथा महोत्सव:जय श्रीराम प्रतिष्ठानच्या शिबिरात 40 दात्यांचे रक्तदान‎, एरंडोल येथे हनुमान कथेचे पारायण; शिबिराचा राजीव कृष्ण महाराजांनी केला शुभारंभ‎

एरंडोल‎एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे‎ हनुमान कथेचे श्रीराम चौकात ५‎ एप्रिल रोजी आयोजन आयोजन‎ केले होते. या शिबिरात ४० दात्यांनी‎ उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.‎ शिबिरात जळगाव शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त‎ संकलन केंद्रातील डॉ. आकाश‎ चौधरी, लक्ष्मीकांत त्रिपाठी, राजेश‎ शिरसाठ, तंत्रज्ञ चेतन पवार,‎ प्रभाकर पाटील, सुभाष सोनवणे‎ यांच्या पथकाने रक्त संकलनाचे‎ सहकार्य केले. शिबिराचा शुभारंभ‎ भागवताचार्य राजीव कृष्ण महाराज‎ यांच्या हस्ते करण्यात आला. या‎ वेळी प्रमोद पाटील, डॉ. राजेश‎ महाजन, अमर महाजन, प्रदीप‎ फराटे, सदानंद पाटील, अवि‎ जाधव, ज्ञानेश्वर पाटील, डॉ. सुमेध‎ महाजन, राकेश झा, मनोज झा,‎ दिनेश पाटील, ऋषिकेश महाजन,‎ अमित पाटील, सनी पाटील, अनंत‎ पाटील, अजय महाजन, कृष्णा‎ पाटील, ओम पाटील, देव जाधव,‎ धीरज पाटील व प्रतिष्ठानच्या‎ सदस्यांचे सहकार्य लाभले.‎

आज मोफत आरोग्य‎ तपासणी शिबिर‎ नेत्र तपासणी, पोटाचे‎ विकार, नाक- कान-‎ घशाची आरोग्य तपासणी‎ शिबिराचे ६ एप्रिल रोजी‎ मोफत आयोजन करण्यात‎ आले आहे. अधिकाधिक‎ नागरिकांनी आरोग्य‎ शिबिराचा लाभ घ्यावा, असे‎ जय श्रीराम प्रतिष्ठानचे‎ अध्यक्ष नितीन पाटील यांनी‎ कळवले आहे.‎