आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ११६ वर्षांची वाचन व ग्रंथ चळवळीची परंपरा असणाऱ्या शेट नारायण बंकट वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत, १२ रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी सहा जणांनी माघार घेतली. आता १६ इच्छुक रिंगणात आहे. डॉ. शुभांगी सत्यजित पूर्णपात्रे व रजनी भरत बुंदेलखंडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दि.२५ रोजी १३ जागांसाठी मतदान होईल.
तालुकास्तर ‘अ’ वर्ग अशी मान्यता असणाऱ्या वाचनालयाची मुहूर्तमेढ १९०६ मध्ये झाली आहे. वाचनालयातर्फे सरस्वती व्याख्यानमाला घेतली जाते. त्यात राज्यभरातील नामवंत साहित्यिक व विचारवंतांनी हजेरी लावली आहे.
वाचनालयाच्या उभारणीत व ग्रंथसंपदा वाढविण्यात डॉ. शा. वा. देव, डॉ.वा.ग.पूर्णपात्रे, डॉ.सुनील घाटे, डॉ.प्रमिला पूर्णपात्रे, प्रा.मंदा देव, डॉ.हेमांगी पूर्णपात्रे, वसंतराव चंद्रात्रे, प्रा.ल.वि.पाठक यांचे मोठे योगदान आहे. वाचनालयाच्या गत निवडणुकीत डॉ. हेमांगी पूर्णपात्रे, प्रा. मालती निकम या बिनविरोध निवडून आल्या होत्या. वाचनालयाने शहराच्या वाचनचळवळीला समृद्ध केले आहे. सरस्वती व्याख्यानमालेच्या आयोजनातून दरवर्षी चाळीसगावातील नागरिकांना मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध होते.
१८ रोजी चिन्ह वाटप
दि.१८ रोजी चिन्ह वाटप होईल. प्रचारासाठी ७ दिवसांचा अवधी मिळणार असून २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान प्रक्रिया राबवली जाईल. याच दिवशी सायंकाळी किंवा २६ रोजी सकाळी ८.३० वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
एकूण ४६८ सभासद
उपकर्ता ९३, आश्रयदाता १९३, आजीव १८२ असे एकूण ४६८ सभासद आहेत. ३० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली. सर्वसाधारण १३ तर महिलांसाठी २ अशा एकूण १५ जागांसाठी २४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. माघारीनंतर १६ उमेदवार रिंगणात आहेत. प्रा. मालती निकम यांनी माघार घेतल्याने दोन्ही महिलांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.