आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांमध्ये भीती‎:भरदिवसा घराचे कुलूप‎ तोडून दागिने लंपास‎

जामठी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील येवती येथे घराच्या‎ दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात‎ चोरट्यांनी घरातील दागिने तथा‎ रोख रक्कम लांबवली. भर दिवसा‎ झालेल्या या चोरीच्या प्रकाराबद्दल‎ सखेद आश्चर्य व्यक्त हाेत असून‎ चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची‎ मागणी नागरिकांनी केली आहे.‎ येवती येथील गोविंदा सुरेश माळी‎ यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप‎ तोडून व घरातील कपाट फोडून‎ त्यातील सोन्याची पोत तथा रोख‎ रक्कम असा एकूण ऐवज‎ चाेरट्यांनी लांबवल्याची घटना‎ बुधवारी सकाळी घडल्याचे समोर‎ आले आहे. दरम्यान गोविंदा माळी‎ यांच्या घरातील तथा संपूर्ण‎ गल्लीतील व गावातील सर्व सदस्य‎ हे गावानजीक असलेल्या अंबऋषी‎ महाराज मंदिरावर आयाेजित कथा‎ सप्ताहाच्या ठिकाणी गेले हाेते.‎

गावांतील बहुतांश सर्व नागरिक‎ कथा श्रवणासाठी गेल्याचे लक्षात‎ घेत भर दिवसा चाेरी केली.‎ या प्रकरणी बोदवड पोलिसांत‎ अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा‎ दाखल करण्यात आला. घटनेचा‎ पंचनामा बोदवड पोलिस ठाण्याचे‎ पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी‎ केला. गुन्ह्याचा अधिक तपास‎ हेडकाॅन्स्टेबल शेजोळे करत असून‎ साऱ्यांचे त्याकडे लक्ष लागले आहे.‎ दरम्यान परिसरात चाेरीच्या घटना‎ वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे‎ वातावरण असून चाेरट्यांचा‎ बंदाेबस्त करण्याची मागणी हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...