आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले तेच बद्दलण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यक्त होणाऱ्यावरच गदा आणली जात आहे. आपली वाटचाल संसदीय लोकशाहीच्या विरोधात चालू असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता भाजपवर केली.
चोपड्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त, मंगळवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रसिध्द गायिका कडूबाई खरात यांचा भिम गितांचा महासंग्राम कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मंचावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी नगराध्यक्षा मनीषा चौधरी, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोसाकाचे माजी चेअरमन अॅड.घनश्याम पाटील, आशिष गुजराथी व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी मंत्री आव्हाड यांन सांगितले की समाजाला मी काहीतरी दिले पाहिजे, ही भावना प्रत्येकाने जोपासावी, असे मंत्री आव्हाड यांनी सांगितले. या वेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
मतभेद चालेल, मनभेद नसावा महात्मा फुले यांनी शोषित लोकांचे साहित्य पुढे आणले. छत्रपती शिवरायांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याइतका अभ्यास कोणाचाही नव्हता. महात्मा गांधी व डॉ.आंबेडकर यांच्यात मतभेद होते मनभेद नव्हते. नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले ते वाचवणे गरजेचे आहे. दलित आणि ओबीसी एकत्र आले तर देशाची स्थिती बदलेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. आंबेडकरांनी जे संविधान लिहले ते महात्मा फुले यांना समोर ठेवून लिहले. रायगडावरची समाधी महात्मा फुले यांनी शोधली, असेही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रसंगी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.