आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेची तार तुटून ती महामार्गावर:तुटलेली विजेची तार; सतर्कतेने अनर्थ टळला

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लाकडाने भरलेल्या उंच वाहनामुळे रस्त्यास क्रॉस करणारी विजेची तार तुटून ती महामार्गावर रस्त्यावर पडली. त्याचवेळी पाऊस सुरू होता. एखाद्या वाहनाचा अथवा चालकाचा या तारेला स्पर्श झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र त्याचवेळी भाजीपाला घेण्यासाठी चाळीसगाव शहरात येत असलेल्या रांजणगाव येथील भाजीपाला विक्रेता शालिक पाटील यांने ही गंभीर बाब पाहीली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता गावातील आणखी दोघा मित्रांना बोलावले. ितघा मित्रांनी लाकडाच्या सहाय्याने ती विजेची तार रस्त्यावरून दूर करत वाहतुक सुरू करून अनेकांचे प्राण वाचवले. त्या तरुणांनी वेळीच तत्परता दाखविली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. हा थरार घटना महामार्ग क्र. २११ अंतर्गत येणाऱ्या चाळीसगाव- कन्नड रस्त्यावरील रांजणगाव फाट्याजवळ गुरुवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास घडला. रस्त्यावरील तारेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहने थांबून लांबच लांब रांगा लागल्या.

यावेळी रांजणगाव येथील तरुण शालिक पाटील हा भाजीपाला घेण्यासाठी मोटारसायकलने चाळीसगावकडे येत होता. त्याच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने तत्काळ गावात धाव घेऊन पप्पू कोष्टी व आकाश सूर्यवंशी या मित्रांना सोबत घेऊन बांबूच्या सहाय्याने ही तुटून रस्त्यावर पडलेली विजेची तार बाजूला केली तर काही तार बांबूच्या सहाय्याने उंच करून बांधली. त्यामुळे रस्त्यावरील धाेका दूर झाला. तसेच खोळंबलेली वाहतूक एका बाजूने सुरू करण्यात या तरुणांना यश आले. त्यांच्या धाडसामुळेच वाहनचालकांनी पुढील प्रवास सुरू केला.

बातम्या आणखी आहेत...