आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गानुभव कार्यक्रम:पाटणादेवी अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला 12 पाणस्थळांवर प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे घेणार नोंदी; रोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षे होती प्रगणना बंद

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • को

गौताळा पाटणादेवी औट्रमघाट अभयारण्यातील वन्यजीवांचा अंदाज यावा यासाठी सोमवार १६ रोजी बुद्ध पौर्णिमेला निवडक पानस्थळांवर निसर्गानुभव कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी अभयारण्यातील १२ पाणवठ्यांवर मचाण तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. बुद्ध पौर्णिमेला सकाळी ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान प्रत्यक्ष वन्य प्राणी निरीक्षण करून नोंदी घेतल्या जाणार असून या काळात पर्यटकांसाठी अभयारण्य बंद राहणार आहे.

६ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्यात ४२ कि.मी लांबीचा सह्याद्रीचे पठार असून ८०० ते २००० हेक्टरचे पाटणा, ओढरे, बोढरे, जुनोने असे चार वन कक्ष व पाटणा तसेच बोढरा हे २ वन परिमंडळ असून ५० पाणवठे आहे.

बातम्या आणखी आहेत...