आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:बैलजोडीची सजावट स्पर्धा; महेश पाटील प्रथम

चोपडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भार्डू या शेतीला पंढरी मानणाऱ्या आदर्श गावाने बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनोख्या ऐतिहासिक बैलजोडी सजावट स्पर्धेच्या माध्यमातून इतर गावांपुढे एक अादर्श उभा केला अाहे. या बैलजोडी सजावट स्पर्धेत २५ बैलजोड्या सहभागी झाल्या. त्यांचे परीक्षण डॉ.संजय गुजराथी, डॉ.एस.बी. कणके, आदर्श शेतकरी एस.बी. पाटील, पारस पाटील, निंबा पाटील, योगेश देसले यांनी केले. बैल जोडीच्या परीक्षणानंतर गुणांकन करण्यात आले. त्यात सर्वात जास्त गुण प्राप्त तीन उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलजोडी व बैलजोडीची उत्तम निगा राखणाऱ्या स्पर्धकांचे नंबर काढून बक्षीस देण्यात आले.

त्यात प्रथम क्रमांक महेश आत्माराम पाटील यांनी पटकावला. त्यांना ५००१ रुपये रोख व १०० किलो ढेप देण्यात आली. दुसरा क्रमांक संभाजी धर्मा पाटील यांनी पटकावला. त्यांना ३००१ रुपये रोख व ७५ किलो ढेप देण्यात अाली. तिसरा क्रमांक युवराज हिलाल पाटील यांनी पटकावला. त्यांना २००१ रुपये रोख व ५० किलो ढेप देण्यात आली. पारितोषिक वितरण गावातील पोलिस पाटील मधुकर अहिरे, माजी सैनिक धनराज पाटील व दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...