आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:जामनेरात मंत्री महाजन यांच्या पुतळ्याचे दहन‎

जामनेर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील एका कार्यक्रमात‎ ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षण‎ मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती‎ शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख‎ केला हाेता. त्यांच्या या वक्तव्याचा‎ जामनेर तालुका महा-विकास‎ आघाडीतर्फे प्रतिकात्मक पुतळा‎ दहन करून निषेध करण्यात आला.‎ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षण‎ मंत्री गिरीश महाजन यांनी पुणे‎ येथील एका जाहीर कार्यक्रमात‎ छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी‎ उल्लेख केला.

त्यांच्या या वक्तव्याने‎ राज्यभरातून त्यांच्यावर टिका केली जात आहे. जामनेर तालुका महा-विकास आघाडीच्या‎ वतीनेही शनिवारी नगरपालिका चौकात मंत्री महाजन यांच्या पुतळ्याचे दहन‎ करून निषेध करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते संजय‎ गरुड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. ज्ञानेश्वर बोरसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष‎ शंकर राजपूत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादीचे युवा‎ तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, राहुल चव्हाण, किशोर पाटील यांच्यासह‎ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...