आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधानोरा जळगाव आगाराती मांजरोद-जळगाव बस रस्त्यावरून घसरून, १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले. गुरुवारी सकाळी ८ वाजता धानोरा-देवगाव रस्त्यावर हा अपघात झाला. जळगाव डेपोची मुक्कामी मांजरोद -जळगाव एसटी बस (क्र.एम.एच.१९.बी.टी. २३६४) धानोरा येथून गुरुवारी सकाळी आठ वाजता आपल्या नियोजित मार्गावर निघाली होती. गुरुवारी सकाळी धानोरा परिसरता बेमोसमी पावसाने तुरळक हजेरी लावली होती. त्यामुळे रस्ता ओला झालेला होता. या रस्त्यावरून जातानाा चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरून बस अचानक घसरून सरळ रस्त्याच्या बाजूला उतरली.
या अपघातात बसमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा एकूण १७ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी बसवाहक पवार नामक यांनी समयसूचकता दाखवत, प्राथमिक उपचार पेटीतील साहित्याद्वारे जखमींवर उपचार केले. ज्ञानेश्वर सोनवणे, गणेश चौधरी, पिंटू कोळी, किरण साळुंके, वैभव साळुंके, वाल्मीक पाटील यांनी मदत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.