आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील चोपडा-धरणगाव रस्त्यावरील मजरेहोळजवळ, चोपडा-धरणगावमार्गे जळगाव जाणारी बस (एम.एच.-२०-१८७५) आणि जळगावहून चोपडाकडे येणारी ट्रक (एम.एच.१८-ए.पी.४०९६) यांची धडक झाली. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातात बसमधील २४ प्रवासी जखमी झाले. ट्रकचालक पसार झाला.अपघातातील एकूण १२ जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतले आहे.
तर १२ जणांना प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली. जखमींमध्ये बसचालक योगेंद्र सुभाष पाटील(वय ३२), देविदास सोनवणे (वय ६०, रा.शिंदेवाडा, चोपडा), गुणवंत पुंजू वाघ (वय ५२, रा.श्रीरामनगर, चोपडा), सुरेश धना पाटील (वय ७०, भावेर,ता. शिरपूर), शितल तुळशीराम गुजर (वय ५०, रा.शिरपूर), सपनाबाई रवींद्र पाटील (वय ४९, रा.वढोदा), लताबाई मधुकर पाटील (वय ४४, मंगरुळ, ता.चोपडा), विमलबाई आनंदा पाटील (वय ६०, रा.विटनेर), जावेद सलीम तेली (वय ३६, सेंधवा), कल्याणी भगतसिंग राजपूत (वय ८), शोभाबाई भिमसिंग राजपूत (वय ७०, रा.चौगाव), मधुकर संतोष पाटील (वय ७०, रा.वढोदा), या १२ जणांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
जखमींवर डॉ.मनोज पाटील, डॉ.तृप्ती पाटील, डॉ.प्रसाद पाटील, डॉ.सागर पाटील यांनी उपचार केले. चोपडा आगारप्रमुख संदेश क्षीरसागर यांनी १४ जखमींना पाच हजार ६०० रुपयांची तात्काळ रोख स्वरूपात मदत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.