आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल होणार:खडके सीम येथे आढळली 11 एकरवर गांजाची शेती

एरंडोल23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरंडोल शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खडके सीम गावालगतच्या नांदगाव ते येवला राज्य मार्गाला लागूनच असलेल्या ११ एकर शेतात आजूबाजूस तूर व मका पेरून शेतामध्ये गांजाची लागवड केलेली आढळून आले आहे. गुरुवारी रात्र झाल्याने शुक्रवारी सकाळी पंचनामा करुन गुन्हा दाखल केला जाणार आहे.

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी सहकाऱ्यांसोबत ३ सायंकाळी खडके सीम येथील गांजाचे शेत गाठले. परंतु, सायंकाळ तसेच अंधार झाल्यामुळे पंचनामा न करता आल्याने गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी शेतात जाऊन आजूबाजूच्या नागरिकांना विचारणा केली. त्यावेळी शेताचे मालक हे बाहेरगावी राहतात, अशी माहिती सांगण्यात आली.

दरम्यान, ३ राेजी रात्री या शेतात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या शेतात चारही बाजूने तार कंपाऊंड केलेले आहे. तसेच रस्त्या लगतच्या दिशेने लोखंडी प्रवेशद्वार लावले आहे. शुक्रवारी सकाळीच पोलिस पंचनामा करून किती गांजाची लागवड केली होती व त्याची किंमत किती असेल, हे सर्व स्पष्ट हाेणार आहे. दरम्यान, शेतमालक जर बाहेरगावी असतात तर शेती कोण करताे? या विषयी संपूर्ण माहिती पंचनामा केल्यानंतरच स्पष्ट हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...