आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कारची एसटीला धडक; दोन प्रवासी गंभीर जखमी

कुऱ्हा काकोडा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगरवरून कुऱ्हा गावाकडे रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास येताना चारठाणा फाट्याजवळ भरधाव कारने (क्रमांक एमएच.३०-एएफ.७७९०) एसटीला (क्रमांक एमएच.४०.एन.९०५९) जोरदार धडक दिली. या अपघातात चालकाने बस रस्त्याच्या बाजूच्या शेतात वळवली. यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र, बसमधील दोन प्रवाशांना दुखापत झाली.

इतर प्रवाशांना किरकोळ मार लागला. अघताच होताच बसमधील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. याप्रकरणी कार चालक राजाराम तुकाराम घोलप (रा.तेल्हारा जि.अकोला) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला. अपघातग्रस्त वाहन कुऱ्हा पोलिस चौकीत जमा करण्यात आले. गुन्ह्याचा तपास कुऱ्हा पोलिस नाईक प्रदीप इंगळे व सहकारी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...