आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरांच्या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी:पाचोऱ्यातील मुख्य रस्त्यावर मोकाट गुरांचा सुळसुळाट; रहदारीला अडथळा अन् अपघाताला निमंत्रण; पालिकेने कारवाई करावी

पाचोरा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील हॉटेल भाग्यलक्ष्मी गार्डन ते वरखेडी नाक्यापर्यंत ५ किलोमीटरच्या अंतरात चार ते पाच ठिकाणी मोकाट गुरांमुळे सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या मार्गावर वाहन चालवणे कठीण होत असल्याने पालिका प्रशासनाने या गुरांच्या कळपाचा बंदोबस्त करुन गुरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

शहरातून राज्य महामार्ग क्रमांक १९ जात असून या मार्गावरुन मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. मालेगाव ते पाचोरा व थेट मलकापूर पर्यंत या रस्त्याचे काम झाले आहे. त्यामुळे पूर्वी मालेगावहून धुळे, पाचोरा, जळगाव ते मलकापूर मार्गे जाणाऱ्या वाहनांचे किमान २५ किलोमीटर अंतर वाचत असल्याने आता ट्रॉला व ट्रक याच मार्गाने ये-जा करतात. या शिवाय शिर्डी, कोपरगाव, येवला, नांदगाव, चाळीसगाव मार्गे येणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ याच रस्त्यावरुन सुरू असते. शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस, एसटी महामंडळाच्या बसेस, दररोज हजारोंच्या संख्येने धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, लक्झरी बसेस, दुचाकी, सायकलीवर ये-जा करणारे नागरिक व विद्यार्थी यांची दररोज या मार्गावर वर्दळ असते. मात्र या रस्त्यावर हॉटेल भाग्यलक्ष्मी गार्डन ते जळगाव चौकाजवळील वरखेडी नाक्यापर्यंत ५ ते ६ ठिकाणी गुरांचे मोठे कळप बसलेले किंवा फिरत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो.
चालकांना खाली उतरून हकलावी लागतात गुरे
अनेकदा चालकांना वाहनाखाली उतरून गुरे बाजूला करावी लागतात. त्यावेळी मात्र गुरांचे मालक कुणीही पुढे येवून आपली गुरे आहेत, असे सांगण्याची हिंमत करत नाहीत. चाालकांना वाहन चालवताना माेठा त्रास हाेत असल्याने माेकाट गुरांचा त्वरीत बंदोबस्त करावा व गुरे मालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...