आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मंगळदेव ग्रहाचा जन्मोत्सव मंत्रघोषात साजरा; जिल्हाधिकारी होते पूजेचे मानकरी

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री मंगळ देव ग्रह मंदिरात मंगळ जन्मोत्सवानिमित्त ५ रोजी मंत्रघोषात विधिवत रित्या पूजा करुन साजरा करण्यात आला. पहाटे ४ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत यांनी पंचामृत अभिषेक केला.सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मक स्वरूपात बाल श्री मंगळ देवाला विराजमान करुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी देवाला ५६ भोग दाखवण्यात आला. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे श्री मंगळ जन्मोत्सवाला मंदिरावर नवे ध्वज लावण्यात आले. ध्वजांचे मानकरी योगेश पांडव यांनी सवाद्य नवे ध्वज मंदिरात आणले.

मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, आनंद महाले, डी. ए. सोनवणे, सुनीता कुलकर्णी, उज्ज्वला शाह, आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट संजय पाटील, औरंगाबादच्या विवेकानंद शिक्षण मंडळाचे सचिव श्रीमंत शिसोदे, संजयसिंह चव्हाण, किशोर व श्रीकांत उपाध्याय यांनी स्वागत केले. राऊत दांपत्याने ध्वजांचे व ध्वजाचे मानकरी असलेल्या पांडव दाम्पत्याचे औक्षण केले. ध्वज पूजनानंतर त्यांना विधिवत रित्या कळसावर व मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले. मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी ध्वजवंदन केले. दरम्यान, सायंकाळी ६ वाजता महाआरती झाली. दिवसभर भाविकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला. वेंकीज या आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनीने गावरान तुपातील बालुशाही प्रसाद म्हणून भाविकांना वितरीत केली. प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, यतीन जोशी, मेहूल कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.

महाभोमयागाचे आयोजन
दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत महाभोमयागाचे येथील बिल्डर सरजू गोकलानी, प्रशांत निकम, इंजिनिअर हेमंत पाठक, शेतकी संघाचे अध्यक्ष संजय पाटील (पिंपळे), बिल्डर महेंद्र पाटील (शिरूड), प्रगतशील शेतकरी भगवान पाटील (जवखेडा), राहुल पाटील (अंतुर्ली), तापीराम पाटील (तासखेडा) व ग. स. बँकेचे अध्यक्ष उदय पाटील (जळगाव) आदी ९ मान्यवर सपत्नीक मानकरी होते. या वर्षापासून महाभोमयोगाच्या प्रथेस प्रारंभ झाला. श्री मंगळ ग्रहाचा शुभांक नऊ असल्याने नऊ मानकरी निमंत्रित केले होते.

बातम्या आणखी आहेत...