आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव साजरा:कायद्याचे भान बाळगून उत्सव साजरा करावा

अमळनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर शहरवासीयांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध सामाजिक एकता जपून उत्तम सहकार्य केले. काेराेना कमी झाल्याने निर्बंध उठले असले तरी कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असे सांगत कायद्याचे भान ठेवून तसेच एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांनी केले.

शहरातील जी. एस. हायस्कूलमधील लायन्स क्लबमध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली, त्या वेळी ते बाेलत होते. या वेळी माजी आमदार शिरीष चौधरी, तहसीलदार मिलिंद वाघ, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, महिला, पोलिस पाटील, नागरिक, सर्व व्यावसायिक आदी उपस्थित होते. दरम्यान, बैठकीपूर्वी झामी चौकातील पोलिस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. बैठकीला सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते. या वेळी वीज, रस्ते, ऑनलाइन नोंदणी या संदर्भात अडचणी मांडण्यात आल्या.

या वेळी पालिकेचे प्रशांत सरोदे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र मिळून मिरवणूक मार्गाची पाहणी केल्याचे पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना सांगितले. तर गणेशोत्सवात स्वतंत्र वीज जोडणी मिळेल, असे विद्युत विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, उत्कृष्ट आरास असलेल्या मंडळांना पालिका प्रशासन आणि तहसीलदार कार्यालयातर्फे तीन बक्षिसे देण्यात येणार आहे, असे या वेळी सांगण्यात अाले.

मिरवणुकीचा मार्ग असा
गणेशाेत्सव मिरवणूक सराफ बाजार ते दगडी दरवाजा, कुंटे रोड, धुळे रोड, तांबेपुरा, सुभाष चौक ते दगडी दरवाजा अशा चार मार्गांनी निघणार आहे. पाचव्या व सातव्या दिवशी तसेच अनंत चतुर्दशी अशा शहरातून तीन दिवस मिरवणुका निघतात. संत सखाराम महाराज संस्थानाजवळील नदीपात्रात, मंदिर ग्रह मंदिर जवळील तलावात व अॅड. पाटील शाळेसमोर तलावात विसर्जन केले जाते.

बातम्या आणखी आहेत...