आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:शिरसमणी येथे चेअरमनपदी भास्कर पाटील अविरोध; व्हाइस चेअरमनपदावर तुकाराम वंजारी यांची निवड

मुंदाणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरसमणी येथे १२ रोजी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची चेअरमन व व्हा. चेअरमन निवड करण्यात आली.चेअरमन पदासाठी भास्कर दिनकर पाटील यांचा तर व्हा.चेअरमन पदासाठी तुकाराम अंबु वंजारी यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज आल्यामुळे दोघांचीही बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत संत उदासी बाबा शेतकरी विकास पॅनलला १३ पैकी ९ जागा मिळाल्या. तर चेअरमन त्याचप्रमाणे व्हाइस चेअरमन यांच्या निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती.

या सभेला संचालक निलाबाई माळी, युवराज गोपाळ, विश्वनाथ पाटील, भगवान पाटील, संभाजी पाटील, गोकुळ पाटील, बापू पवार, गुलाब पाटील, सुंदरबाई पाटील आदी संचालक हजर होते. रोहीदास पाटील, बालू पाटील, सरपंच सतीश पाटील, माजी विकासो चेअरमन मनोहर पाटील, किशोर पाटील, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन, ग्रा.पं. सदस्य जितेंद्र पाटील, निंबा महाजन, दादाभाऊ पाटील, रामराव पाटील, प्रकाश पाटील, हेमराज पाटील, संजय पाटील, अरुण पाटील, रवींद्र पाटील, भागवत पाटील, बापू पाटील, समाधान पाटील, प्रदीप पाटील यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...