आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगावातील घटना:कावळ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कारवरील ताबा सुटला; कार उलटून महिला ठार, 4 गंभीर‎

चाळीसगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव‎ येथील मेडिकल व्यावसायिक व जळगाव जिल्हा मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप ताराचंद‎ ‎ बेदमुथा यांची कार रस्त्यावर बसलेल्या कावळ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ताबा सुटून उलटली.‎ त्यामुळे झालेल्या अपघातात‎ कारमधील त्यांच्या पत्नी कांचन‎ बेदमुथा (वय ४७) यांना जबर‎ मार लागल्याने त्यांचा जागीच‎ मृत्यू झाला. तर कारमधील‎ बेदमुथा यांच्यासह चार जण‎ जबर जखमी झाले. यात त्यांच्या‎ आई व मुलांचा समावेश आहे.‎

ही घटना चाळीसगाव-नागद‎ रस्त्यावर हातले गावाजवळ‎ शनिवारी सकाळी ९ वाजेच्या‎ सुमारास घडली.‎ शहरातील हनुमान वाडी‎ भागातील रहिवासी संदीप‎ बेदमुथा हे नागद येथील भावाला भेटण्यासाठी आई, पत्नी, मुलगा‎ व मुलगी यांच्यासह त्यांच्या‎ स्कोडा कार (क्र. एमएच ०४‎ एफ एफ ९५२३) या गाडीने‎ नागदकडे जात होते.

सकाळी ९‎ वाजेच्या सुमारास हातले‎ गावाजवळील वीट भट्टीजवळ‎ समोर रस्त्यावर कावळा‎ बसलेला असल्याने संदीप‎ बेदमुथा हे त्यास वाचवण्यास‎ गेले, मात्र त्यात त्यांचा‎ कारवरील ताबा सुटून कार‎ उलटली. त्यात कांचन बेदमुथा‎ (वय ४७) यांच्यासह संदीप‎ बेदमुथा (वय ५०), सायराबाई‎ बेदमुथा (वय ७५), जागृती‎ बेदमुथा (वय २६) व देवेश‎ बेदमुथा (वय २०) हे गंभीर‎ जखमी झाले. कांचन यांना‎ अपघातात जबर मार लागल्याने‎ त्यांचा मृत्यू ओढवला.‎ कन्नडच्या आमदारांनी दिली‎ अपघाताची माहिती‎ या झालेल्या अपघाताची‎ माहिती कन्नडचे आमदार‎ उदयसिंग राजपूत यांनी संदीप‎ बेदमुथा यांचे चुलत भाऊ दीपक‎ जैन यांना कळवली.

दीपक जैन‎ यांनी घटनास्थळी धाव घेत‎ नागरिकांच्या मदतीने जखमींना‎ खाजगी वाहनातून शहरातील‎ खाजगी रुग्णालयात दाखल‎ केले. डॉक्टरांनी कांचन बेदमुथा‎ यांना तपासून मृत घोषित केले.‎ तर संदीप बेदमुथा, सायराबाई‎ बेदमुथा, जागृती बेदमुथा व‎ देवेश बेदमुथा यांना जबर मार‎ लागल्याने खासगी रुग्णालयात‎ दाखल करण्यात आले.‎ याप्रकरणी दीपक जैन यांनी‎ दिलेल्या माहितीवरून‎ चाळीसगाव ग्रामीण पोलिस‎ ठाण्यात अपघाताचा गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...