आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य सब ज्युनियर बेसबॉल अजिंक्य पद स्पर्धा अमरावती येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली हाेती. त्यात चाळीसगाव मुले व मुली यांचे संघ सहभागी झाले होते. मुलांचा संघ उपविजेता ठरला तर मुलींच्या संघाने अजिंक्यपद प्राप्त केले. स्पर्धेत मुलांच्या संघात चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालयाचे ११ खेळाडू सेंट जोसेफ हायस्कूलचे ३ तर मेहुणबारे येथील गिरणा प्रसारक मंडळ विद्यालयाचे ३ खेळाडू होते. तसेच मुलींच्या संघात गिरणा विद्यालयाच्या मुलींचा समावेश होता.
या स्पर्धेवेळी मुलांच्या संघाने वाशीम, सांगली, सातारा, कोल्हापूर या संघांना हरवले. मात्र अंतिम सामन्यात पुणे संघाबरोबर फक्त एक होम रनने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चाळीसगाव संघ उपविजयी ठरून त्यास राैप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर मुलींच्या संघाने नासिक, अमरावती, भंडारा, कोल्हापूर या संघांवर विजय मिळवत थेट अजिंक्य पद प्राप्त केले. या दाेन्ही संघांना क्रीडा शिक्षक अजय देशमुख, प्रदीप साखरे, नीलेश गाढवे, योगेश साळुंखे, योगेश शिंदे, भागवत पाटील, निशांत राजपूत, साईजीत खरात याचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल दोन्ही संघाचे येथील सर्व क्रीडा शिक्षकांनी काैतुक केले. तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान विजयामुळे संघांमध्ये उत्साह अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.