आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:चाळीसगाव एज्यु. घटनादुरुस्ती,चेअरमन अन् प्राचार्य गैरहजर

चाळीसगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. यात संस्थेची प्रलंबित २०१७ ची घटनादुरुस्ती कळीचा मुद्दा ठरला होता. या पार्श्वभूमीवर निवडणुकीनंतर प्रथमच धर्मादाय आयुक्त जळगाव यांच्याकडे घटना दुरुस्तीसंदर्भात बुधवारी दि.२३ रोजी सुनावणी होती. घटनादुरुस्ती सादर करताना अर्जदार तथा चेअरमन नारायणदास अग्रवाल व प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी सुनावणीवेळी जबाबासाठी हजर राहणे आवश्यक होते. याबाबत संस्थेचे अॕॅड.डी.ओ.पाटील यांनी दोघांनाही पत्र दिले होते. तरीही दोघेजण सुनावणीला गैरहजर होते.संस्थेने नियुक्त केलेले वकील व सचिवांच्या पत्राकडे दुर्लक्ष करत घटनादुरुस्ती प्रकरणात, अर्जदार व प्राचार्य दोघांनीही पहिल्याच सुनावणीला दांडी मारली. जळगावातील सुनावणीला संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर हे हजर होते.

घटनादुरुस्ती हिताची प्रलंबित असलेली घटनादुरुस्ती ही सभासदांच्या हिताची असल्याचे जाणकारांचे मत आहे. कारण संस्थेचे साडेआठ हजार सभासद फक्त मतदान करतात, त्यापैकी ६० ते ७० सभासदच उमेदवारी करू शकतात. मात्र घटनादुरुस्ती झाल्यास सर्वच सभासदांना उमेदवारी करता येईल. त्यामुळे घटनादुरुस्ती होणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...