आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रवाल:चाळीसगाव एज्यु. सोसा. चेअरमनपदी सलग सहाव्यांदा नारायणदास अग्रवाल

चाळीसगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शतकोत्तर शैक्षणिक परंपरा असणाऱ्या चाळीसगाव एज्युकेश सोसायटीच्या मॕॅनेजिंग बोर्ड चेअरमनपदी नारायणदास अग्रवाल यांची गुरुवारी, सलग सहाव्यांदा निवड झाली. निवडीनंतर त्यांनी पदभार स्विकारला.

चेअरमन निवडीसाठी गुरुवारी सकाळी संस्थाध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. हात उंचावून झालेल्या मतदान प्रक्रियेत अग्रवाल यांना १४ तर डॉ. सुनील राजपूत यांना ४ मते मिळाली. यावेळी उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, ज्येष्ठ संचालक सुरेश स्वार, भोजराज पुन्शी, श्यामलाल कुमावत, अशोक वाणी, कनकसिंग राजपूत, योगेश अग्रवाल, नीलेश छोरिया, जितेंद्र वाणी, योगेश करनकाळ, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, के.एन.तडवी, सुलोचना इंगळे, नाना मोरे, संजय पवार, प्रमोद दायमा आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...