आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी; मतदानासाठी उरले सहा दिवस, तीन पॅनेलमध्ये सरळ लढत

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची निवडणूक अवघ्या सात दिवसांवर आली असून तिन्ही पॅनलच्या उमदेवारांचा प्रचार सुरु आहे. एकूण १८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत प्रगती पॅनलचे ५ उमेदवार बिनविरोध असून त्यांच्या निवडीची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे १३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांच्या प्रगती पॅनेलमध्ये १८ जागांसाठी १८ उमेदवार उभे आहेत. यातील व्हॉइस पेट्रन गटातून विद्यमान संचालक योगेश अग्रवाल व अॅड. प्रदीप अहिरराव हे बिनविरोध झाले आहेत. पेट्रन, सर्वसाधारण व फेलोज गटातून प्रत्येकी दोन जागांसाठी प्रतिस्पर्धी गटातून प्रत्येकी एकच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण व सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी स्वर्गीय डॉ. वा. ग. पूर्णपात्रे प्रेरीत परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून १८ जागांसाठी आपले १३ उमेदवार उभे केले आहेत.

यात उपाध्यक्षपदासाठी सुचित्रा पाटील यांना संधी दिली आहे. तिसऱ्या सोसायटी बचाव पॅनलमध्ये अध्यक्षपदासाठी राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सी. सी. वाणी, सचिव पदासाठी अरुण पाटील व डोनर गटातून भानुदास जाधव व विजय शर्मा हे चौघे उमेदवार आहेत. याशिवाय सकल जैन समाजाचे पदाधिकारी संदीप जैन हे डोनर गटातून अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. १८ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात असले तरी मतदारांना पूर्णच्या पूर्ण म्हणजे १८ पैकी १८ मते द्यावी लागणार आहेत. एक मत कमी किंवा जास्त दिले तर मतपत्रिका बाद हाेईल.

हे ही आजमावताहेत नशीब
सचिवपदासाठी परिवर्तनतर्फे डॉ. विनोद कोतकर, प्रगतीचे प्राचार्य मिलिंद बिल्दीकर व सोसायटी बचावचे अरुण पाटील उभे आहेत. मागील निवडणुकीत नारायणदास अग्रवाल यांच्या गटातून अध्यक्षपदासाठी पराभूत झालेले भाजपचे के. बी. साळुंके यावेळी परिवर्तनकडून रिंगणात आहेत. या गटात प्रगती पॅनलकडून रामकृष्ण पाटील, सोसायटी बचावचे सी. सी. वाणी देखील आहेत. डोनर गटाच्या पाच जागांसाठी १३ उमेदवार असून यात अशोक वाणी, श्यामलाल कुमावत, जितेंद्र वाणी, राकेश राखुंडे, दिलीप चौधरी, डॉ. सुनील राजपूत, भूषण ब्राह्मणकर, सुधीर पाटील, वर्धमान धाडीवाल, महेंद्र पाटील, संदीप जैन भानुदास जाधव व विजय शर्मा हे नशिब अजमावत आहेत.

अशी हाेणार लढत
परिवर्तन पॅनलचे पेट्रन, फेलोज व सर्वसाधारण गटात प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असले तरी या गटात मतदारांना दोन मते द्यायची आहेत. सिनिअर पेट्रन गटात परिवर्तनचे बाळासाहेब चव्हाण व सुरेश चौधरी तर प्रगती पॅनलतर्फे सुरेश स्वार व प्रशांत पाटील आहेत. पेट्रन गटात प्रगतीतर्फे भोजराज पुन्शी, नीलेश छोरिया यांची लढत परिवर्तनचे राजेंद्र चौधरी यांच्याशी तर उपाध्यक्ष पदासाठी परिवर्तनतर्फे सुचित्रा पाटील यांची प्रगतीचे उमेदवार मिलिंद देशमुखशी लढत आहे.

बातम्या आणखी आहेत...