आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:चाळीसगाव पालिकेने हाती घेतली तितूर नदीपात्र साफसफाईची मोहीम

चाळीसगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्यावर्षी पावसाळ्यात तितूर नदीला तब्बल सात पूर आले होते. त्यात नदीकाठावरील घरे, दुकानांमध्ये पाणी शिरून आतोनात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने यंदा सतर्क होत शहरातील तितूर नदीपात्र साफसफाईची मोहीम गुरूवारपासून हाती घेतली आहे. पालिका व मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा अभियानातून हे काम होत आहे. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, नगर अभियंता प्रदीप धनके, प्रेमसिंग राजपूत, दीपक देशमुख, भूषण लाटे यांच्यासह मिशन ५०० कोटी जलसाठा अभियानाचे पदाधिकारी उपस्थित होते. गतवर्षी पहिल्याच पूरात शहर व परिसरातील जवळपास २५०० घरे, झोपड्या, दुकाने, गोठाशेड यांचे नुकसान झाले होते. तर पाचव्या पुरात या नदी किनाऱ्यालगतची २०० दुकाने व घरे वाहून गेली होती.

अतिक्रमणही हटवणार : गुरूवार पासून नदीपात्राची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात या नदीवरील शहरातील तिन्ही पुलाखाली मोऱ्यांमध्ये अडकलेला कचरा व गाळ काढला जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात नदीपात्रातील गाळ काढला जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात नदीकाठाचे अतिक्रमण काढले जाईल, असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...