आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारांनी साधला संवाद:पंतप्रधानांच्या मन की बात संवादातून चाळीसगाव येथील विद्यार्थी मंत्रमुग्ध

चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “मन की बात’ या कार्यक्रमात विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले हाेते. पंतप्रधानांचा संवाद एकचित्ताने ऐकून विद्यार्थ्यांनी वेळोवेळी टाळ्या वाजवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावनेला साद घातल्याने आज खऱ्या अर्थाने पंतप्रधान व विद्यार्थ्यांमध्ये संवादाचा सेतू निर्माण झाल्याचे दिसून आले.खासदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील अनु. जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत स्वता खासदारांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.

या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, सरचिटणीस अॅड. प्रशांत पालवे, सरचिटणीस अमोल मानकर, सरचिटणीस जितेंद्र वाघ, पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती दिनेश बोरसे, माजी उपसभापती संजय पाटील, जिल्हा अल्पसंख्यांक महिला अध्यक्षा रिझवाना खान, नगरसेविका विजया पवार, युवा मोर्चाचे हर्षल चौधरी, रवी चौधरी, युवा मोर्चाचे अनिल गोत्रे, व्यापारी आघाडीचे अमित सुराणा, युवा मोर्चाचे राहुल पाटील, वाल्मीक महाले, रवी राजपूत, बंडू पगार, राजू पगार व विद्यार्थी हजर होते. प्रभारी मुख्याध्यापक डी. व्ही. सावळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शिक्षक ध्रुवास राठोड, डी. बी. परदेशी, एस. डी. महाजन, आर. व्ही. सोनवणे, ग्रंथपाल संजय सोनवणे, अनिता तोंडे, संभाजी पाटील, ज्ञानेश्वर लिंगायत या वेळी हजर होते.

‘मन की बात’ विद्यार्थ्यांची प्रश्नोत्तरे
‘मन की बात’ या कार्यक्रमानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करुन काही प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी या प्रश्नांना उत्स्फूर्त उत्तरे दिली. तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी आभार मानले. शहर सचिव अमोल नानकर यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याचे आश्वासित केले. प्रत्येक महिन्याला होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचा विद्यार्थ्यांनी या वेळी संकल्प केला.

बातम्या आणखी आहेत...