आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:चाळीसगाव तालुक्यात 5 ग्रा.पं.साठी उद्या मतदान ; ग्रामपंचायतींचा समावेश

चाळीसगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विभाजन झालेल्या सहा ग्रामपंचायतींपैकी लोणजे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. आता पाच ग्रामपंचायतींसाठी गुरूवारी दि. ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या गावातील मतदानाची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. आज (दि.३) सकाळी निवडणूक कर्मचारी संबंधित गावांकडे रवाना होतील. ६ ग्रामपंचायतींच्या २० प्रभागातील ५४ जागांपैकी एकूण २१ जागा बिनविरोध झाल्या असून, आता ३२ जागांसाठी ९५ उमेदवार रिंगणात आहेत.

तालुक्यात विभाजित झालेल्या तळेगाव, कृष्णानगर, लोणजे, आंबेहोळ, सुंदरनगर व चिंचगव्हाण या ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. सुंदनगर तांडा ग्रामपंचायतींच्या ५ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. चिंचगव्हाण ग्रामपंचायतीत ५ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आंबेहोळ ग्रामपंचायतीत १० जागांसाठी २७ उमेदवार आहेत. कृष्णानगर ग्रामपंचायतीत एसटी महिला या जागेवर कुणीच उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने ही जागा रिक्त आहे. तर उर्वरीत ८ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. तर लोणजे ग्रामपंचायत यापुर्वीच बिनविरोध ठरली आहे. एकूण ६ ग्रामपंचायतीतील २० प्रभागात ५४ जागांपैकी २१ जागा बिनविरोध ठरल्या आहेत. ३२ जागांसाठी आता ९५ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या तळेगाव ग्रामपंचायतीत ७ जागा बिनविरोध ठरल्या असून, उर्वरीत सर्वसाधारण वर्गाच्या ४ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत.

तळेगावात चार जागांसाठी ८ उमेदवार आहेत रिंगणात
तळेगाव ग्रामपंचायतीत ४ प्रभागात ११ जागांसाठी ३३ अर्ज वैध ठरले होते. त्यात १८ अर्ज माघारी घेतले गेले. सात जागांसाठी प्रत्येकी एक उमेदवार असल्याने ७ जागा बिनविरोध ठरल्या असून, उरलेल्या सर्वसाधारण वर्गाच्या ४ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात प्रभाग क्रमांक ३ मधील दाेन जागांसाठी हिरापूर-तळेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य अतुल अनिल देशमुख यांच्यासह चेतनकुमार देशमुख, आबासाहेब शिताेळे, माणिकराव शेलार हे चार उमेदवार रिंगणात आहेत. येथे देशमुख यांच्या ग्रामविकास पॅनलकडे एकहाती सत्ता आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अतुल देशमुख यांच्या पत्नी सोनाली देशमुख यांना पराभव पत्करावा लागला होता. यंदा त्या प्रभाग क्रमांक २ मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
मतदानाची तयारी पूर्ण
प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमाेल माेरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. निवडणूक होणाऱ्या पाच ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी १५ मतदान केंद्र असून, ५ कर्मचारी व १ पोलिस अशा ६ कर्मचाऱ्यांची १५ पथके आहेत. एकूण ९० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तळेगाव येथे २ मतदान केंद्रे, कृष्णानगर ३, सुंदरनगर ३, चिंचगव्हाण ३ व आंबेहोळ ४ केंद्र आहेत.

बातम्या आणखी आहेत...