आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पसंती:चाळीसगावकरांची केशर अन् बदाम आंब्यांना पसंती; अक्षय्य तृतीयेनिमित्त पूजा साहित्यासह घागर खरेदी

चाळीसगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला घागर, आंबा, पितरांच्या पुजेसाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची शहरातील मुख्य बाजारपेठेत सोमवारी गर्दी झाली होती. आंबे, घागरीच्या खरेदीला नागरिकांची झुंबड उडाल्याने सोमवारी बाजारात चैतन्य संचारले होते. शिवाय वाहनांचे बुकिंगही तेजीत होते. या व्यतिरिक्त डांगर, कलिंगडालाही मागणी होती. दर आवाक्यात असल्याने रसासाठी चाळीसगावकरांनी केशर, बदाम आंब्यांना पसंती दिली.

अक्षय्यतृतीया आज मंगळवारी साजरी होत आहे. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तातील एक असून या दिवशी सोने चांदी खरेदीला विशेष महत्व दिले जाते. अक्षय्य तृतीयेला घागर पुजन, आंबे व पुरणपोळीचा नैवद्य हे समीकरण पुर्वापार चालत आले आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला आंबे व घागरीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात.

कडक उन्हातही खरेदीचा उत्साह
तापमानाने ४३ अंशांचा पारा ओलांडल्याने कडक ऊन व हवेतील उष्मा याला न जुमानता शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...