आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक प्रक्रिया:चाळीसगाव पालिकेच्या अंतिम प्रभाग रचना कार्यक्रमात बदल; दोन दिवसांची मुदतवाढ

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला मंगळवारी मान्यता मिळणार होती. या प्रभाग रचनेसंबंधी आलेल्या सर्व १२ हरकती फेटाळण्यात आल्याने अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होवून चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक आयोगाने आता त्यात अंशत: बदल केला असून ती रचना ९ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे आता अंतिम प्रभाग रचनेसह प्रभागातील आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडत कधी निघते? कोणत्या प्रभागात काय आरक्षण निघते, याची उत्सुकता लागली आहे. पालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना गत महिन्यात जाहीर झाली होती. एकूण १८ प्रभागाच्या प्रारूप रचनेवर १० ते १४ मे या दरम्यान राज्य आयोगाने हरकती मागवल्या होत्या. मुदतीत १२ हरकती व सूचना प्राप्त झाल्या. त्याबाबत सुनावणीनंतर आयोगाने हरकती फेटाळाल्या. ७ जूनला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार होती. मात्र त्यात बदल होऊन ७ ऐवजी ९ रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.

१८ प्रभागांमधून ३६ नगरसेवक निवडले जाणार यंदा पालिकेत एक प्रभाग व नगरसेवकांच्या दोन जागा वाढल्या. त्यामुळे शहरात १८ प्रभाग झाले असून त्यातून ३६ नगरसेवक निवडले जाणार आहेत. नव्या रचनेत प्रभाग क्रमांक १७ ची विभागणी करण्यात येवून १८ क्रमांकाचा प्रभाग अस्तित्वात आला. गत निवडणुकीत पालिकेत १७ प्रभागातून ३४ नगरसेवक निवडले होते. यंदाही एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून येतील. तर नगराध्यक्ष नवनियुक्त नगरसेवकांमधून निवडला जाईल.

एक प्रभाग अन् दोन नगरसेवक वाढले गेल्या वेळेप्रमाणेच यंदाही रचना असणार आहे. प्रभाग रचनेत फारसा बदल नसून केवळ प्रभागांचे क्रमांक बदलले आहेत. गत निवडणुकीत प्रभाग क्र. १ हा मालेगाव रोडपासून सुरू झाला होता. आता बदलत्या रचनेत तो प्रभाग क्र. ८ झाला आहे. तर प्रभाग क्र. १ हा धुळे रस्त्याकडील शहर हद्दीपासून सुरू झाला आहे. एक प्रभाग वाढल्याने पूर्वीच्या १७ व्या क्रमांकाच्या प्रभागातील नागद रोड, हुडको, पाटणादेवी रोड, घाट रोड,हरिगिरीबाबा नगर, पीर मुसा कादरी बाबा दर्गाहच्या पाठीमागील भाग, कोदगाव रोड पुलापर्यंत, तिरंगा पुल अशा भागाची विभागणी करून तो प्रभाग १७ व नवा प्रभाग क्र. १८ केला आहे.

आरक्षणासाठी इच्छुकांचे देव पाण्यात : पालिकेवर गेल्या साडेपाच महिन्यांपासून प्रशासक राज आहे. पावसाळ्यानंतर पालिका निवडणुका हाेण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत पालिकेवर प्रशासक राज कायम राहील. प्रभाग रचना अंतिम झाल्याने इच्छुकांना संभाव्य लढतीचा अंदाज आला आहे. आता प्रभागातील आरक्षण काय निघते? याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे. आपल्या प्रभागाचे आरक्षण आपणास अनुकूल निघावे यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. १२ हरकती फेटाळल्या प्रभाग रचनेबाबत १२ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ४ हरकती प्रभाग क्र.१२ तील दत्तवाडी, विजयसिंग राजपूत नगर, प्रभाग क्र. १० व ११ हिरापूर रोड, प्रभाग क्र.२ भडगाव रोड, रमाबाई आंबेडकर नगर, प्रभाग क्र. १७ नागद रोड येथील हाेत्या. त्यात नव्या प्रभागातील काही भाग जुन्या प्रभागात समाविष्ट करण्याबाबत हरकत घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...