आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचोपडा पालिकेच्या ३१ पैकी १६ जागांवर महिलांचे आरक्षण निघाले. राष्ट्रवादीचे माजी गटनेते जीवन चौधरी यांचा प्रभाग क्र. ५ सर्वसाधारण महिला व अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव झाला आहे. त्यामुळे चौधरी यांना नव्या वॉर्डातून निवडणूक लढवावी लागेल. पालिकेत अमळनेरच्या प्रांत सीमा अहिरे, मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढली. यात प्रभाग १ सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग २मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग ३मध्ये सर्वसाधारण महिला, अनु. जाती सर्वसाधारण, प्रभाग ४मध्ये अनु. जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग ५मध्ये सर्वसाधारण महिला, अनु.जमाती सर्वसाधारण, प्रभाग ६ मध्ये सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग ७मध्ये सर्वसाधारण, महिला सर्वसाधारण, प्रभाग ८मध्ये सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग ९ मध्ये सर्वसाधारण, महिला सर्वसाधारण, प्रभाग १० मध्ये सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग ११मध्ये सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग १२ मध्ये सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग १३ मध्ये सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग १४ मध्ये सर्वसाधारण महिला ,सर्वसाधारण, प्रभाग १५ मध्ये अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण निघाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.