आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा व युवक संचालनाल:स्काऊट-गाइडच्या सहाय्यक जिल्हा आयुक्तपदी चव्हाण

मुंदाणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक संचालनालयातर्फे तामसवाडी विद्यालयाचे प्राचार्य ए.के.चव्हाण यांची, भारत स्काऊट आणि गाईड संस्थेच्या सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) पदावर नियुक्ती झाली आहे. जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

जिल्ह्यात ४२९९ स्काऊट व गाईड युनिट सुरू असून, १ लाख २५ हजार मुले-मुली या चळवळीत सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्रात जळगाव जिल्हा द्वितीय क्रमांकावर असून त्यात चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील, माजी जि.प सदस्य रोहन पाटील यांनी निवडीचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...