आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:मुख्यमंत्र्यांचा जिल्हा गुर्जर समाजातर्फे गाैरव

चोपडा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल-वरील नंदनवन निवासस्थानी जळगाव जिल्ह्यातील गुर्जर समाज बांधवांकडून सत्कार करण्यात आला.अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष तथा जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील सुनील चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. या वेळी जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, जामनेर, धरणगाव या तालुक्यातील गुर्जर समाज संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी गुर्जर समाज प्रतिष्ठानचे शिवाजी पाटील, भागवत पाटील, प्रा. राजेंद्र पाटील, कुलाबा येथील रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, अंकुश पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील संघटनेचे अनेक पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान, लवकरच जळगाव जिल्ह्यात भेट देणार असून, या भेटीत गुर्जर समाजातील पदाधिकाऱ्यांसोबत जळगाव येथे चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिनिधींना दिले. तर सुनील चौधरी यांनी आव्हाणे येथे भेट देण्याचीही विनंती केली.

बातम्या आणखी आहेत...