आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांच्या हस्ते गाैरव:पूर्णपात्रे विद्यालयातील पालक सभेत बालकलाकाराचा सत्कार; पालक सभेत मुलांना माेफत गणवेशाचे वितरण

चाळीसगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयात २८ रोजी पालक सभेत बाल कलाकाराचा पालकांच्या हस्ते गाैरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या सचिव डॉ. शुभांगी पूर्णपात्रे होत्या. या वेळी मंचावर आंतरराष्ट्रीय बाल कलाकार पुरस्कार प्राप्त अर्जुन पूर्णपात्रे, मुख्याध्यापक रमेश सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र वराडे उपस्थित होते. सातवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक योगेश साळुंखे यांनी तर अहवाल वाचन राजेंद्र वराडे यांनी केले.

या वेळी विशेष सत्कारार्थी म्हणून आंतरराष्ट्रीय बाल कलाकार पुरस्कार प्राप्त व नुकताच प्रदर्शित होणारा चित्रपट “एकदा काय झालं’ यातील बाल कलाकार अर्जुन पूर्णपात्रे याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेत विविध उपक्रम राबवताना पालकांचे ही सहकार्य आवश्यक असल्याचे मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी सांगितले. डॉ. शुभांगी पूर्णपात्रे यांनी शाळा व पालक यांच्यातील नात्यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी पालकांनी ही काही सूचना मांडल्या. पालकांच्या सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल, अशी ग्वाही या वेळी देण्यात आली. या सभेला पालकांची माेठ्या संख्येेने उपस्थिती हाेती.

विविध स्पर्धेतील यशस्वितांचा गुणगाैरव
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश देण्यात आले. सूत्रसंचालन योगेश साळुंखे यांनी केले. बक्षीस यादी वाचन मनीषा पाटील यांनी तर आनंद जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...