आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:चोपडा सूतगिरणीची बैठक; नेते गैरहजर

चोपडा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तापी सहकारी सहकारी सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी, मंगळवारी चोपडा पीपल्स बँकेच्या सभागृहात दुपारी चार वाजता काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी व जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल गैरहजर होते. सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यावर चर्चा झाली.

माजी आमदार दिलीप सोनवणे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, माजी जि.प.अध्यक्ष गोरख पाटील, चोकाचे माजी चेअरमन अॅड. घनश्याम पाटील, चंद्राहास गुजराथी, चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे, उद्योजक सुनील जैन, माजी जि.प. सदस्या इंदिरा पाटील, चोसाकाचे व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, बाजार समितीचे माजी सभापती जगन्नाथ पाटील, गिरीश पाटील उपस्थित होते. जळगावात सोमवारी नेत्यांचे वाद पाहून मनाला वेदना झाल्या. सूतगिरणी चालवणे कठीण बनत आहे, असे माजी आमदार कैलास पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...