आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:चाळीसगावात महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे नागरिकांना परतावे लागले माघारी; नायब तहसीलदारांसह 50 कर्मचाऱ्यांचा सहभाग; तहसील कार्यालयात शुकशुकाट

चाळीसगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील १ हजार १४४ महसूल कर्मचारी ४ तारखेपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यात चाळीसगाव प्रांत व तहसील कार्यालयातील सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याने आठवड्याभरात दुसऱ्यांदा महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना कामाविनाच माघारी परतावे लागले.

महसूल कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २३ मार्चपासून साखळी आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्या अंतर्गत जेवणाच्या सुटीत निदर्शने तसेच घंटानादासह काळ्या फिती लावून कामकाज केले जात होते. तरीही शासनाने मागण्यांकडे लक्ष न दिल्याने कर्मचाऱ्यांनी २८ मार्चला एक दिवसाचा संप पुकारला होता. या वेळी ४ एप्रिलपासून बेमुदत संप करण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेने दिला हाेता.

तहसील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय ... साेमवारपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे तहसील कार्यालयातील कामकाज पुन्हा ठप्प झाले. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ५ नायब तहसीलदार, १ मंडळाधिकारी, ८ अव्वल कारकून यांच्यासह लिपिक, शिपाई असे तहसील व प्रांत कार्यालयातील जवळपास ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना माघारी परतावे लागले.

बातम्या आणखी आहेत...