आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी:आरोग्य तपासणी शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा : अमोल पाटलांचे आवाहन

एरंडोलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य तपासणी शिबिरांमुळे गरीब रुग्णांची सोय होते. नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार चिमणराव पाटील यांच्या सहकार्याने आणि सभापती अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व नम्रता गणेश मंडळातर्फे देशमुख मढी परिसरात आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषधी वाटपप्रसंगी ते बोलत होते. बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड अध्यक्षस्थानी होते.

माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, जळूचे माजी सरपंच रवी जाधव प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. शिबिरात हजारो महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करून त्यांनी मोफत औषधींचे वाटप करण्यात आले. सभापती अमोल पाटील यांनी शिबिराचे उद‌्घाटन केले. डॉ. फिरोज शेख, डॉ. अमोल पाटील, डॉ. योगीराज पळशीकर, डॉ. जुबेर शेख, परिचारिका पूनम धनगर, योगीता परदेशी यांनी तपासणी केली.

बातम्या आणखी आहेत...