आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक वारसा सप्ताह:कन्हेर गडावरील बुरूजांची स्वच्छता; चाळीसगाव येथील सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

चाळीसगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक वारसा सप्ताह येथे १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जात आहे. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही चाळीसगावच्या सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे या सप्ताहात राज्य पुरातत्व विभाग व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सहभाग घेऊन पाटणादेवी येथील कन्हेर गड व कन्हेर गडाच्या पायथ्याशी असलेल्या हेमाडपंथी महादेव मंदिरावर स्वच्छता मोहीम राबवून आपला वैभवशाली वारसा जतन करण्याच्या दृष्टीने समाजास संदेश दिला.

या वेळी हेमाडपंथी महादेव मंदिर परिसरातील प्लास्टीक कचरा, काचेच्या बाटल्या गाेळा करून त्या नष्ट करण्यात आल्या. तसेच संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. त्याचप्रमाणे कन्हेर गड येथील बुरुज, कमान यावर उगवलेले गवत काढून तेथेही स्वच्छता करण्यात आली. या नंतर कन्हेर गड ते मद्रासी बाबा असा ट्रॅक करून सह्याद्रीच्या विलोभनीय, विहंगम अशा सौंदर्याचे सहभागी सदस्यांनी या माेहिमेत दर्शन घेतले.

या वेळी पाटणा येथील नितीन चौधरी यांनी सहकार्य केले. संपूर्ण उपक्रमात सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, गजानन मोरे, विनोद शिंपी, नाना चौधरी, सचिन पाटील, जितेंद्र वाघ, गणेश पाटील, भाऊसाहेब पाटील, दीपक दाभाडे, जयंत शेलार, पहिलवान सचिन पाटील, अभिषेक गुंजाळ, मयूर भागवत, चेतना भागवत, कोमल भागवत, मुकुल भागवत, नितेश भागवत, हर्षल पाटील, विजय कदम, राजेंद्र नगरकर, दर्शन चौधरी, ललित चौधरी, रोहन राठोड, शुभम निकुंभ, यश पवार, विराज वाघ, वैष्णवी पाटील, रत्नदीप पाटील, अमोल कोठावदे, प्रथमेश कदम यांनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...