आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता अभियान‎:नागरिकांनीच राबवले‎ शाळेत स्वच्छता अभियान‎

उपक्रम‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा‎ तालुक्यातील खडकदेवळा बुद्रूक‎ येथे डॉ.वाय.पी. युवा फाउंडेशन,‎ बाळासाहेब के.एस. पवार माध्यमिक‎ विद्यालय, साईनाथ सार्वजनिक‎ वाचनालय व ग्रंथालय यांच्या‎ संयुक्त विद्यमाने राष्ट्र संत‎ गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त‎ त्यांना अभिवादन करून‎ ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात‎ आले.‎ सर्वप्रथम राष्ट्र संत गाडगेबाबा‎ यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व‎ दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष‎ तथा वाचनालयाचे संचालक संजय‎ निकम, विश्वास पाटील, उत्तम‎ खर्देकर, शालेय समितीचे अध्यक्ष‎ प्रमोद गरूड, फाउंडेशनचे‎ डॉ.यशवंत पाटील, सर्व शिक्षक‎ आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत‎ करण्यात आले.

यानंतर मान्यवरांसह‎ विद्यार्थी व ग्रामस्थांनी शाळेचा पूर्ण‎ परिसर आणि गावातील महादेव‎ मंदिराच्या परिसरात हातात खराटा‎ घेऊन ग्राम स्वच्छता अभियान‎ राबवले. तसेच यापुढे आपला‎ परिसर आणि गाव स्वच्छ ठेवण्याचे‎ वचन घेतले.‎ डॉ.यशवंत पाटील यांनी‎ गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याची‎ माहिती देत मार्गदर्शन केले. ते एक‎ महान समाजसुधारक व युगपुरुष‎ होते, असे त्यांनी सांगितले.‎ प्रास्ताविक चंद्रकांत पाटील यांनी‎ केले तर आभार एस.एन. पाटील‎ यांनी मानले. कार्यक्रम‎ यशस्वितेसाठी माध्यमिक विद्यालय,‎ वाचनालय, फाउंडेशन व ग्रामस्थांचे‎ सहकार्य लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...