आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:विद्यार्थ्यांची स्मशानभूमी, मंदिर परिसरात स्वच्छता‎ ; यावल तालुक्यात केले अभिवादन

चाळिसगांव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल‎ शहरातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे‎ तसेच अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी‎ रविवारी स्वच्छता अभियान राबवले. महात्मा‎ गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या‎ जयंतीनिमित्त स्मशानभूमी, महादेव मंदिर परिसर‎ स्वच्छ करण्यात आला.‎ विद्यार्थी, परिसरातील नागरिकांमध्ये‎ स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी, यावल शहर‎ अतिशय स्वच्छ आणि सुंदर व्हावे या उद्देशाने हा‎ कार्यक्रम राबवण्यात आला. आयोजन यशोगाथा‎ अकॅडमी व चाणक्य अकॅडमीचे संचालक‎ उमेश धनगर यांनी राजू सुरणार, सुवास भालेराव‎ यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. कमलेश‎ शिर्के, मोहन जयकारे, शुभम माळी, नईम शेख,‎ अभय अडकमोल, गणेश मोरे, कामिल तडवी,‎ राहुल बोडे, कमलेश डांबरे, शरीफ तडवी, रोहन‎ पारधे आदींनी सहकार्य केले.‎

सजीव दाव्यांमुळे पोदार स्कूलमध्ये रंगत‎ अकलूज जवळील पोदार इंटरनेशनल स्कूलमध्ये महात्मा गांधी आणि‎ लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य आनंद हिराला‎ शाह यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यानंतर पालक व विद्यार्थ्यांसाठी‎ आईस्क्रीमच्या काड्यांपासून चरखा बनवणे, कागदापासून लालबहादूर‎ शास्त्रींची टोपी बनवणे, तीन माकडांच्या चित्राला बोटांच्या ठशांच्या साह्याने‎ रंगवणे, प्रश्नमंजुषा स्पर्धा झाल्या. गांधीजी, कस्तुरबा, लालबहादूर शास्त्री‎ यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दांडी यात्रेचा देखावा सादर केला.‎

साकळीत जीवनकार्याची माहिती‎
तालुक्यातील साकळी येथील शारदा विद्या‎ मंदिरात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर‎ शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात‎ आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य‎ आर.जे.महाजन, तर व्यासपीठावर पर्यवेक्षक‎ एस.जे.पवार, बी.ई.महाजन,‎ वाय.बी.सपकाळे, किरण चौधरी,‎ एन.पी.पाटील हे उपस्थित होते. मान्यवरांच्या‎ हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री‎ यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात‎ आले. पी.एम.पाटील यांनी जळगावच्या गांधी‎ रिसर्च फाउंडेशन यांच्यामार्फत परीक्षा घेतली,‎ असे सांगितले. प्राचार्य आर.जे.महाजन यांनी‎ महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसेची‎ शिकवण, तर भारताचे माजी पंतप्रधान‎ लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला ‘जय जवान‎ जय किसान’या घोषणेविषयी माहिती दिली.‎

बातम्या आणखी आहेत...