आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथकाचा छापा‎:जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई, दोन्ही गोदामे सील‎

धरणगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने‎ ४ रोजी छापा टाकून शहरातील दोन धान्य‎ गोदाम सील केले. या कारवाईमुळे खळबळ ‎ ‎ उडाली आहे.‎ शहरातील चोपडा रोडवरील दोन‎ गोदामांवर ४ रोजी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या ‎पथकाने अचानक छापा टाकला. गोदामावर‎ पथक धडकल्यानंतर गोदाम परिसरात मोठ्या ‎ ‎ प्रमाणात मोकळ्या जागेत धान्य आढळले. ‎पथकाने लागलीच गोदामऊन सील केले.‎ त्यानंतर पथकाने चोपडा रोडवरील दुसऱ्या ‎गोदामावर धडक दिली. याठिकाणी देखील‎ मोठ्या प्रमाणात धान्य आढळून आले.‎ त्यामुळे पथकाने दोन्ही गोदाम सील केले.

थेट ‎जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यामुळे‎ स्थानिक महसूल प्रशासनाला संबधित ‎ ‎ गोदामांच्या बाबतीत माहिती नव्हती का?,‎याबाबतची चर्चा धरणगावात रंगली होती. ‎यापुर्वीदेखील यातील एका गोदामाची‎ तपासणी झाली होती. ही कारवाई‎ जिल्हाधिकारी यांच्यामार्फत झाली अाहे.संबंधितांवर कारवाई संदर्भात माझ्याकडे ‎ ‎ कोणतिही माहिती आलेली नाही, अस तहसीलदार देवरे यांनी सांगितले.‎

धरणगाव येथील दोन धान्य गोदामात‎ तपासणी करताना जिल्हाधिकारी मित्तल.‎खुलासा देण्याचे निर्देश‎ धरणगावातील दोन गोदाम सील केले‎ आहेत. या ठिकाणी धान्यसाठा आढळून‎ आला आहे. संबंधितांकडे त्याची माहिती‎ मागितली आहे. संबंधितांना धान्यसाठ्याच्या‎ पावत्या सादर करण्यासाठी तीन दिवसांची‎ मुदत दिली अाहे. त्यांच्याकडून खुलासा‎ आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईची‎ दिशा ठरवली जाईल.‎ -अमन मित्तल, जिल्हाधिकारी, जळगाव‎

बातम्या आणखी आहेत...