आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्पाला भेट:जिल्हाधिकाऱ्यांची तुती लागवड प्रकल्पाला भेट

जामनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी अमित मित्तल यांनी जामनेर तालुक्यातील सोनाळा येथे, शेतकऱ्यांच्या तुती लागवड प्रकल्पाला भेट दिली. तसेच रेशीम कीड संगोपन केंद्राची त्यांनी पाहणी केली.

जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुती लागवडी करून आर्थिक क्रांती घडवावी असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत प्रांताधिकारी महेश सुधळकर, तहसीदार अरुण शेवाळे, अव्वल कारकून हर्षल पाटील, तलाठी राठोड, तांत्रिक पॅनल अधिकारी प्रणाली सोनवणे, सरपंच रघुनाथ पाटील, ग्रामरोजगार सेवक अनिल पाटील, शेतकरी धनराज पाटील, योगेश पाटील, संदीप पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील, परिक्षित पाटील, मधुकर पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...