आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नोंद‎:अज्ञात वाहनाची धडक,‎ पाचोऱ्यातील युवक ठार‎

पाचोरा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अज्ञात वाहनाच्या धडकेत‎ शहरातील सिंधी काॅलनी‎ परिसरातील २१‎ वर्षीय युवकाचा ‎दुर्दैवी मृत्यू झाला.‎ही घटना ८ मार्च‎रोजी मध्यरात्री ‎घडली.‎याप्रकरणी‎ पाचोरा पोलिस‎ स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद‎ करण्यात आली आहे.‎सिंधी काॅलनी परिसरातील‎ रहिवासी नवीन गोपालदास‎ वासवानी हा युवक ८ रोजी, रात्री‎ १२:३० वाजेच्या सुमारास घरासमोरुन‎ जात होता.

त्यावेळी अज्ञात‎ चारचाकीने नवीनला धडक दिली.‎ त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत‎ त्याला नातेवाईक सेवकराम‎ वासवानी यांनी ग्रामीण रुग्णालयात‎ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी‎ डॉ. अमित साळुंखे यांनी त्यास मृत‎ घोषित केले. घटनेची माहिती‎ मिळताच सिंधी काॅलनी परिसरात‎ शोककळा पसरली. ९ रोजी‎ शहरातील सिंधी बांधवांनी आपली‎ दुकाने बंद ठेवली. या घटनेतील‎ वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...