आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 टक्के दरवाढ‎:रंग, गुलाल, पिचकाऱ्या बाजारात;होळी, धुळवड सणाचा‎ बाजारावर चढला रंग‎

चाळीसगाव‎ / अजय कोतकर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या‎ होळीसाठी शहरातील दुकाने सजली‎ असून यंदा होळीच्या वस्तू‎ खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला‎ प्रतिसाद मिळत असल्याने‎ बाजारपेठेत उत्साह आहे. यंदा २० ते‎ २५ टक्क्यांनी साहित्य महागले आहे.‎ मात्र, दोन वर्षांच्या कोरोना‎ कालखंडानंतर निर्बंधमुक्त होळी‎ साजरी करण्यासाठी ग्राहकांचा कल‎ वाढला आहे.‎ होळी म्हणजे नाते जपणारा आणि‎ विविधरंगी रंगांचा सण. रंगाची‎ उधळण करणाऱ्या या सणासाठी‎ चाळीसगावच्या बाजारपेठ सज्ज‎ झाल्या आहेत. शहरातील घाट रोड,‎ भडगाव रोड, मालेगाव व धुळे रोड‎ तसेच छत्रपती शिवाजी महाराज‎ चौक, स्टेशन रोड, गणेश रोड या‎ परिसरात होळीसाठी लागणाऱ्या‎ साहित्यांनी दुकाने सजली आहेत.‎ दरम्यान, शनिवार व रविवारी‎ ग्राहकांच्या गर्दीमध्ये अजून वाढ‎ होण्यची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त‎ केली आहे. होळीनिमित्त रंग आणि‎ पिचकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात‎ विक्री होत आहे.

यंदा भारतीय‎ बनावटीचे रंग आणि पिचकाऱ्यांना‎ जास्त मागणी आहे. रंग, पिचकारी,‎ गाठींच्या किमतीत २० ते २५ टक्के‎ वाढ झाली आहे. हर्बल आणि‎ नैसर्गिक रंगांना जास्त मागणी आहे.‎ यंदा जीएसटीमुळे वस्तूंचे भाव‎ वाढले असून भारतीय आणि चिनी‎ बनावटीच्या पिचकाऱ्यांमध्ये स्पर्धेचे‎ वातावरण असल्याचे विक्रेते‎ सांगतात. यावर्षी गुलाल आणि‎ रंगाच्या किमतीतही १० ते १५ टक्के‎ वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...