आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढती सायबर गुन्हेगारी धोकेदायक‎:विद्यार्थ्यांशी संवाद ; पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील यांचे मार्गदर्शन‎

अमळनेर‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढती सायबर गुन्हेगारी‎ समाजासाठी धोकेदायक असून‎ सावधानता हाच बचावाचा मुख्य‎ उपाय आहे, असे प्रतिपादन मारवड‎ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद‎ पाटील यांनी केले. मारवड‎ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना‎ सायबर गुन्हेगारीबाबत मार्गदर्शन‎ करताना ते बोलत होते.‎ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठ व कै. न्हानाभाऊ‎ मनसाराम तुकाराम पाटील कला‎ महाविद्यालय, मारवड यांच्या‎ संयुक्त विद्यमाने आयोजित,‎ आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत‎‎‎‎‎‎‎‎‎‎ या कार्यक्रमाचे आयोजन झाले.‎ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारवड‎ पोलिस ठाणे येथे सायबर क्राईम या‎ विषयावर उपनिरीक्षक विनोद पाटील‎ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.‎

वाढती सायबर गुन्हेगारी, महिलांना‎ येणारे निनावी फोन कॉल,‎ रोडरोमियोद्वारा महिलांना होणारा‎‎‎‎‎‎‎‎‎‎ त्रास, तसेच महिलांच्या हितासाठी‎ असलेल्या कायद्यांबाबत‎ विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात‎ आले. विद्यार्थिनींनी विचारलेल्या‎ विविध प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उत्तर‎ दिले. प्रा.डॉ.संजय पाटील,‎ प्रा.डॉ.नंदा कंधारे, प्रा. किशोर‎ पाटील हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...